Commission for Backward Classes :राज्य मागासवर्ग आयोगाने निरपेक्षपणे सर्वेक्षण करावं:राजेंद्र कोंढरे
Continues below advertisement
राज्य मागासवर्ग आयोगानं महाराष्ट्रातील मराठा , ओबीसी, व्हीजेएनटी आणि खुल्या प्रवर्गातील इतर जातींचं सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. या सर्वेक्षणाच्या माध्यमातून या जातसमूहांचे सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक मागासलेपण मोजले जाणार असून त्यासाठीचे निकष एकच असणार आहेत . राज्य मागासवर्ग आयोगाच्या या निर्णयावर अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांनी प्रतिक्रिया दिलीय. या सर्वेक्षणासाठी निकष ठरवताना साठ - सत्तर वर्षांपूर्वी जे निकष लावले ते आज लावू नयेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. त्यांच्याशी बातचीत केलीय आमच्या प्रतिनिधींनी...
Continues below advertisement