Satara Maharashtra Kesari: पावसामुळे स्पर्धेचा स्टेज कोसळला, कालच्या लढती सकाळच्या सत्रात ABP Majha
साताऱ्यात काल वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे स्पर्धेचा स्टेज कोसळला. तसंच पावसामुळे मातीचे आखाडे आणि मॅट्सची दुरावस्था झालीय. त्यामुळे ऐनवेळी कालचे सामने रद्द करण्याची वेळ आयोजकांवर ओढावली. दरम्यान काल रद्द झालेल्या सर्व स्पर्धा थोड्या वेळात सुरु होणार आहेत. कालच्या लढती सकाळच्या सत्रात करण्याची तयारी सुरु करण्यात आली आहे. सध्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे २२५ सामने शिल्लक आहेत. हे सामने झाल्यानंतरच अंतिम सामना खेळवला जाणार आहे.