Pandharpur Vitthal : महाराष्ट्राचं आराध्य दैवत श्री विठ्ठल आणि रखुमाईचा शाही विवाह सोहळा संपन्न
Continues below advertisement
महाराष्ट्राचं आराध्य दैवत श्री विठ्ठल आणि रखुमाईचा शाही विवाह सोहळा संपन्न झालाय. वसंत पंचमीला विठ्ठल आणि रुक्मिणीचं लग्न झाल्याची, अख्यायिका आहे. आणि त्याप्रमाणेच आज विठ्ठल मंदिरात देवाचा विवाहसोहळा पार पडला. यावेळी सजलेली रुक्मिणीमाता आणि विठुरायाचं रुप डोळ्यांचं पारणं फेडणारं होतं. दुपारी हा विवाहसोहळा संपन्न झाला आणि संध्याकाळी विठ्ठल मंदिरापासून शोभायात्रा निघाली. विठ्ठल आणि रुक्मिणीच्या वेशातले चिमुरडे, पारंपारिक पोशाख परिधान केलेले भक्त यावेळी विठुरायाच्या नामस्मरणात तल्लीन झाल्याचं दिसलं.
Continues below advertisement
Tags :
Vitthal Wedding Wedding Ceremony Vasant Panchami Rakhumai Royal Wedding Ceremony Aradhya Daiwat 'Maharashtra Abundant Vitthal And Rukmini Akhyayika Traditional Dress