Maratha Reservation : मागासवर्ग आयोगानं दिलेला अहवालाला मंत्रिमंडळात मंजुरी मिळालीये : ABP Majha
राज्यातील मागासवर्ग आयोगानं दिलेला अहवालाला मंत्रिमंडळात मंजुरी मिळालीये.. मराठा समजाला दहा टक्के आरक्षण देण्यात येणार आहे. इंद्रा सहानी केसनुसार मराठा समाज आरक्षणास पात्र असल्याचा निष्कर्ष अहवालात आहे... राज्यातील २८ टक्के असलेल्या मराठा समाजाला इतर मागास प्रवर्गात ठेवणे पूर्णपणे असामान्य ठरेल अशी माहिती आयोगाने अहवालात दिलीये
मागासवर्ग आयोगाच्या अहवालात मराठा समाज मागस असल्याचंही म्हटलंय. 50 टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण देण्यास आवश्यक असलेली अपवादात्मक परिस्थिती असल्याचा उल्लेखही अहवालात करण्यात आलाय.. थोड्याच वेळात एकनाथ शिंदे विधिमंडळ अधिवेशनात मराठा आरक्षणावर बोलतील.