Junnar : राज्यात एकच बिबट निवारा केंद्र, बिबट्यांच्या वाढत्या संखेमुळे जागेची कमतरता...
राज्यातल्या अनेक भागातील सध्या बिबट्याचा वावर पाहायला मिळतोय.. मात्र या पकडलेल्या बिबट्यांना ठेवण्यासाठी आणि त्यांना इजा झाल्यास त्यांच्यावर उपचार करण्यासाठी राज्यात एकच बिबट निवारा केंद्र आहे.. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील या केंद्रात जितक्या बिबटयांना ठेवण्याची क्षमता आहे त्याहून कितीतरी अधिक प्रमाणात बिबटे आढळत असल्याने या केंद्राच्या विस्तारीकरणाचा विचार असून त्यासाठी जलसंपदा विभागाकडे जागेची मागणी करण्यात आलीय . कशी आहे या बिबट निवारा केंद्रातील परिस्थिती पाहुयात या विशेष रिपोर्टमधून..