CM Shinde : खारघरच्या सेंट्रल मैदानावर महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम होणार

Continues below advertisement

ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारींचा येत्या रविवारी नवी मुंबईतल्या सोहळ्यात महाराष्ट्र भूषण या सर्वोच्च पुरस्कारानं गौरव करण्यात येईल. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे खास या सोहळ्यासाठी महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. महाराष्ट्र शासनाचा महाराष्ट्र भूषण हा सर्वोच्च पुरस्कार २०२२ या वर्षासाठी ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना फेब्रुवारीत जाहीर करण्यात आला होता. या पुरस्काराचा वितरण सोहळा येत्या रविवारी म्हणजे, १६ एप्रिल रोजी सकाळी १०.३० वाजता खारघरच्या आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट मैदानावर संपन्न होईल. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या प्रमुख उपस्थितीत आप्पासाहेब धर्माधिकारींना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात येईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खारघरमधील आंतरराष्ट्रीय कॉर्पोरट मैदानावर जाऊन महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान सोहळ्याच्या तयारीचा आढावा घेतला.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram