Kolhapur Vidhva: विधवा प्रथा बंद करणारं महाराष्ट्रातलं पहिलं गाव, हेरवाड... | Herwad | ABP Majha

Continues below advertisement

स्त्रीचं लग्न झाल्यानंतर तीच्या नवऱ्याचं घरंच तिच्यासाठी सगळंकही असावं आणि सर्वस्व तीनं आपल्या पतीलाच समजावं हेच आपल्या समाजात अपेक्षित असतं. आणि महणूनच की काय पतीच्या निधनानंतर स्त्रीचं कुंकू पुसलं जातं, तिच्या हातातील बांगड्या फोडल्या जातात, मंगळसूत्र तोडलं जातं, जोडवी काढली जातात. ही प्रथा भारतीय समाजात अगदी हजारो वर्षांपासून चालत आलीए. पण याच प्रवाहाची जणू दिशाच बदलण्याचं धाडस महाराष्ट्रातल्या एका गावाने केलाय. ते गाव आहे कोल्हापूर. विधवा प्रथा बंद करण्याचा महत्वपूर्ण ठराव पारीत करणारं हे महाराष्ट्रातलं पहिलं वहिलं गाव. गावाच्या याच कामगिरीबद्दल सांगणारा हा व्हिडीओ. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram