Eknath Shinde : दर्यापूर येथे शिवरायांचा पुतळा तातडीने बसविण्यात येईल मुख्यमंत्र्यांचे आश्वासन
abp majha web team
Updated at:
22 Jul 2022 09:28 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppEknath Shinde : मुंबई येथे दर्यापूर येथील शिवसेना तालुकाप्रमुख गोपाल पाटील अरबट यांच्या नेतृत्वात शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्ते मुंबईला रवाना झाले. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी शेकडो कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये शिंदे गटात जाहीर प्रवेश केला आहे. यादरम्यान दर्यापूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्यात यावा अशी मागणी कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्याकडे केले असता मुख्यमंत्र्यांनी दर्यापूर येथे तातडीने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आपण दर्यापूर शहरांमध्ये बसवु असे आश्वासन दिले