Thane Unlock Guidelines : ठाणे जिल्ह्यात दुकानं 10 वाजेपर्यंत, तर हॉटेल दुपारी 4 पर्यंत परवानगी

 ठाणे : कोरोना साथीची दुसरी लाट ओसरू लागल्याने ठाण्यातील अत्यावश्यक सेवेतील सर्व दुकाने आठवड्याच्या सर्व दिवशी रात्री 10 वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली आहे. ठाणे जिल्हाधिकारी यांनी बैठक घेऊन निर्बंधांमध्ये शिथिलता आणली आहे. त्यानुसार काही नियमांमध्ये सूट देण्यात आली आहे. राज्य सरकारने निर्बंध काही प्रमाणात शिथिल करताच ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी  शहरासाठी नवे आदेश जारी केले. 

 

काय आहेत नवे नियम?

  • अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळून इतर दुकाने आणि आस्थापना सोमवार ते शनिवार रात्री दहा वाजेपर्यंत सुरू राहतील आणि रविवारी बंद राहतील. तर शॉपिंग मॉल्स पूर्णतः बंद राहणार आहे.
  • रेस्टॉरंट आणि हॉटेल्स सोमवार ते शनिवार संध्याकाळी चार वाजेपर्यंत सुरू राहतील. रविवारी पूर्ण वेळ बंद राहतील, या दरम्यान पार्सल सेवा सुरू राहणार
  • रेस्टॉरंट्स आणि हॉटेल 50 टक्के क्षमतेने सुरू
  • व्यायाम शाळा योगा क्लास सलुन ब्युटी पार्लर आणि स्पा 50 टक्के क्षमतेने सोमवार ते शनिवार रात्री दहा पर्यंत सुरू राहतील आणि रविवारी बंद राहणार
  • सार्वजनिक मैदाने आणि उद्याने केवळ व्यायाम, चालणे, धावणे, आणि सायकलिंगसाठी सकाळी पाच ते सकाळी नऊ वाजेपर्यंत सुरू राहतील
  • सर्व सिनेमागृह, नाट्यगृह, मल्टीप्लेक्स बंदच राहतील
  •  सर्व शासकीय आणि खाजगी कार्यालय 100% क्षमतेने सुरू राहतील
  • धार्मिक स्थळे अजूनही बंदच राहतील
  • चित्रीकरण हे दिलेल्या वेळेनुसार सुरू
  • उपनगरीय लोकल बाबत मुंबई महानगरपालिकेने दिलेले आदेश लागू राहतील. म्हणजेच लोकल प्रवेश बंद असणार आहे
  • लग्न समारंभ पन्नास लोकांच्या उपस्थितीत तर अंत्यविधी वीस लोकांचा उपस्थितीस परवानगी देण्यात आली आहे 
  • सार्वजनिक वाहतूक सेवा सुरू राहणार आहे.  मात्र उभ्याने प्रवास करता येणार नाही

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola