Thane Traffic | ट्रॅफिकचा त्रास ठाणेकरांनी आणखी किती वर्ष सोसायचं Special Report

Continues below advertisement

Thane Traffic | ट्रॅफिकचा त्रास ठाणेकरांनी आणखी किती वर्ष सोसायचं Special Report
   ठाणे बोरिवली बोगदा(Tunnel) प्रकल्प लवकरात सुरू होणार आहे,बोरिवली- ठाणे दीड तासांचा प्रवास अवघ्या २० मिनिटांवर येणार.बोरिवली - ठाणे भुयारी (बोगदा) मार्गाच्या नॅशनल पार्क मधील जागेची पाहणी स्थानिक आमदार प्रकाश सुर्वे यांच्यासोबत अधिकारी वर्गाकडून पहाणी करण्यात आली होती.मात्र नॅशनल पार्क परिसरातील पहिल्या टप्प्यातील साधारणपणे 650 झोपड्या या मार्गामुळे बाधित होणार असल्याने बोरिवली ठाणे बोगदा मार्ग रखडला होता. मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांचा प्रयत्नाने एम.एम.आर.डी आयुक्तांसोबत बैठक घेऊन तात्काळ बाधित 325 घरांना शेजारी शिफ्टिंग देण्याच्या आज निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे बोरिवली-ठाणे बोगदा मार्गाचा मार्ग मोकळा झाला आहे आणि लवकरात कामाला सुरुवात होणार आहे. बोरिवलीच्या नॅशनल पार्क परिसरात ज्या ठिकाणी या भुयारी मार्गाला सुरुवात होणार होता येथील झोपड्यांचे पुनर्वसन केल्याशिवाय या कामाला सुरुवात करू नये अशी भूमिका स्थानिकांनी आणि आमदार प्रकाश सुर्वे यांनी घेतली मात्र येथील झोपड्या या म्हाडा,एसआरए,तसेच खाजगी जागेवर असल्यामुळे या सर्व यंत्रणांना एकत्रित बैठक घेऊन पुनर्वसनाचा प्रश्न निकाली काढू असे आश्वासन त्यावेळी स्थानिक आमदार प्रकाश सुर्वे यांनी झोपडीधारकांना दिले होते. यानंतर आमदार प्रकाश सुर्वे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाठपुरावा करत बोरिवली-ठाणे बोगदा मार्गांमधला सर्व अडथळा दूर केली आहे.बोरिवली ठाणे हे दीड तासाचे अंतर भुयारी मार्गामुळे वीस मिनिटांवर येणार आहे.यामुळे मुंबईकरांच्या प्रवास सुखकर होण्यासोबतच इंधन बचत देखील होणार आहे

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram