Thane Police Year End : ठाण्यात साडेसहा हजार पोलीस सज्ज, थर्टी फर्स्टच्या पार्ट्यांवर ठेवणार नजर
नवीन वर्षाच्या स्वागताचे काऊंटडाऊन सुरू झाले असून थर्टी फस्टंच्या पाट्यांची 'झिंग' हवशानवशांना चढू लागली आहे. मात्र ओमायक्रोनचे संकट असल्याने काही निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यामुळे कायदा सुव्यवस्था धाब्यावर बसवून पाटर्चा झोडणाऱ्यांवर ठाणे पोलिसांची करडी नजर असणार आहे. यासाठी शहरातील तलाव, खाडीकिनारा, हॉटेल्स तसेच महत्त्वाच्या ठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या फौजफाट्यात साडेसहा हजार पोलीस, चारशे अधिकारी आणि 350 ट्रॅफिक पोलीस इन अॅक्शन असणार आहेत.