Thane Navratri | टेंभीनाक्याच्या देवीच्या आगमनाची मिरवणूक, उपमुख्यमंत्री Eknath Shinde उपस्थित

ठाण्यातील कळवा येथून टेंभीनाक्याच्या देवीच्या आगमन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापनेच्या निमित्ताने ही मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली. टेंभीनाका परिसरातील या देवीच्या आगमनाची मिरवणूक ठाणे आणि कळवाकरांसाठी विशेष आकर्षणाचे केंद्र असते. अनेक नागरिकांसाठी हे श्रद्धेचे आणि भक्तीचा सोहळा असतो. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत मंडळाचे कार्यकर्ते आणि महत्त्वाचे पदाधिकारी देखील उपस्थित होते. दरवर्षीप्रमाणे अत्यंत पारंपरिक थाटामाटात ही मिरवणूक सुरू झाली. देवीचा रथ आणि सिंहासनावर विराजमान झालेली देवीची मूर्ती या मिरवणुकीचे मुख्य आकर्षण आहे. यासोबतच नरकासुराच्या वधाचे सादरीकरण आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आले आहेत. कळवा येथील देवीच्या मूर्तीचा कारखाना पारंपरिकरीत्या वर्षानुवर्षे एकाच मूर्तीकाराकडून मूर्ती बनवतो. आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर यांनी या कार्यक्रमाची अधिक माहिती दिली.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola