Thane : ठाणे आणि मुंबईला जोडणाऱ्या कोपरी पूलाच्या जुन्या मार्गिका अखेर बंद : ABP Majha
ठाणे आणि मुंबईला जोडणाऱ्या कोपरी पूलाच्या जुन्या मार्गिका अखेर बंद करण्यात आले आहेत. या मार्गीका पूर्णतः तोडून त्या जागी नवीन मार्गिका उभारण्यात येणार आहेत. कोपरी पुलामुळे पूर्व द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी होत होती. त्यामुळेच या पुलाच्या रुंदीकरणाचे काम 2018साली हाती घेण्यात आले. हे काम दोन टप्प्यात करण्यात येत आहे. त्यातील पहिल्या टप्प्याचे म्हणजेच जुन्या पुलाच्या बाजूला नवीन दोन मार्गिका उभारण्याचे काम पूर्ण झाले आहे. त्या मार्गीका सुरू झाल्यामुळे आता जुन्या मार्गिका बंद करून त्या तोडण्यात येत आहेत. या कामामुळे सकाळी आणि संध्याकाळी ठाणे आणि मुंबईच्या वेशीवर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. मात्र आज पहिल्या दिवशी वाहतूक विभागाने केलेल्या व्यवस्थापनामुळे वाहतूक कोंडी झाली नसल्याचे चित्र बघायला मिळाले. याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर यांनी