Thane MNS Protest : ठाण्यात मनसेचा आक्रोश मोर्चा, सत्ताधारी शिवसेनेविरोधात मनसे आक्रमक
ठाण्यातील सत्ताधारी शिवसेनेविरोधात मनसे आक्रमक झाली. आज मनसेनं शिवसेनेच्या विरोधात आक्रोश मोर्चा काढला. ठाण्यातील मासुंदा तलाव ते महापालिका मुख्यालय असा हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात हजारो मनसैनिक सहभागी झाले होते. शिवसेनेने निवडणुकीच्या काळात दिलेली आश्वासनं पूर्ण न केल्याचा आरोप मनसेनं केलाय. या आंदोलनाचे नेतृत्व मनसे नेते अभिजीत पानसे आणि मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी केलं.