Thane MNS Protest : खेळाच्या मैदानावर अतिक्रमण,मनसे कार्यकर्ते पालिकेत खेळले फूटबॉल ABP MAJHA
Thane MNS Protest : खेळाच्या मैदानावर अतिक्रमण,मनसे कार्यकर्ते पालिकेत खेळले फूटबॉल ABP MAJHA
णे पालिकेत नगर अभियंताच्या कार्यालयाबाहेर मनसेचे अनोखे आंदोलन खेळाच्या मैदानावर अतिक्रमण झाल्याने पालिका अधिकाऱ्याच्या कार्यालयाबाहेर फुलबॉल खेळत केले आंदोलन बोरीवडे येथील खेळाच्या मैदानावर अतिक्रमण झाल्याच्या आरोप पालिकेला पत्रव्यवहार करुणदेखील कारवाई न झाल्याने मनसेचे आंदोलन हापालिकेमध्ये नगर अभियंताच्या दालना बाहेर मनसे चे फुटबॉल खेळ आंदोलन.. Anchor :- ठाण्यातील घोडबंदर रोड येथील बोरिवडे मैदानावर ठेकेदाराने साहित्याचे 'डम्पिंग' केले आहे. या मैदानावर आर एम सी प्लांट, लोखंडी पाईप, कामगारांच्या पत्र्याच्या खोल्या उभारण्यात आल्या असून अवाढव्य यंत्रसामुग्री मैदानात ठेवल्याने तरुणांना, लहान मुलांना खेळासाठी हे मैदान उपलब्ध होत नाही. याच कारणामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जनहित विधी कक्षाचे अध्यक्ष स्वप्निल महेंद्रकर यांनी ठाणे महानगरपालिकेतील नगर अभियंताच्या दालना बाहेर कार्यकर्त्यांसमवेत फुटबॉल खेळत अनोखे आंदोलन केले आहे.. वारंवार पत्रव्यवहार करूनही मैदानावरील अतिक्रमण हटवले नसल्याने फुटबॉल खेळत असल्याचे महेंद्रकर यांनी सांगितले..