Thane Metro Trial Run | Metro 4A चाचणी, डिसेंबरपर्यंत सेवा सुरू, प्रवासाचा वेळ वाचणार

मुंबई ईस्ट, वेस्टला जोडणाऱ्या महत्वाच्या बातमीने सुरुवात. आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाणेकर नागरिकांची Metro Train ची प्रतीक्षा आता संपण्याची चिन्हं आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत Metro 4A मार्गिकेची आज चाचणी घेण्यात आली. MMRDA अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार Cadbury Junction ते Gaimukh या साडेदहा किलोमीटर अंतरासाठीची Metro सेवा यंदा डिसेंबरअखेर सुरू होण्याची शक्यता आहे. Wadala, Thane, Kasarvadavali या बत्तीस किलोमीटरच्या अंतरासाठी Metro 4 कार्यान्वित होणार आहे आणि Metro 4A मार्गिका त्या Metro 4 मार्गिकेचाच एक भाग आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या माहितीनुसार Metro 4 या मार्गिकेचं काम डिसेंबर दोन हजार सव्वीस पर्यंत पूर्ण होईल आणि ही Metro सेवा दोन हजार सत्तावीस साली सुरू होईल. पण तूर्तास तरी Metro 4A येत्या डिसेंबरपर्यंत ठाणेकरांसाठी कार्यान्वित होणार आहे. "हा देशातला सगळ्यात लांब मार्ग होईल. अठ्ठावन्न किलोमीटरचा हा मार्ग होईल की ज्याच्यामध्ये जवळपास एकवीस लाख लोकं रोज हे प्रवास करू शकतील आणि प्रवासाचा वेळ या Metro मार्गामुळे पन्नास ते पंच्याहत्तर टक्के या ठिकाणी कमी होणार आहे." हा मार्ग Mumbai शहर आणि Thane शहर या सगळ्यांना जोडणारा ठरणार आहे. ठाणेकरांना यामुळे मोठा दिलासा मिळेल.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola