Thane Mayor Naresh Mhaske : ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के स्वत: बनवलेले कोरोनाचे नियम विसरले
ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी खरं तर आज सकाळीच एक प्रसिद्धीपत्रक काढून नागरिकांना सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचं आवाहन केलं होतं. पण त्याच महापौरांच्या निधीतून उभारण्यात आलेल्या सभागृहाच्या लोकार्पण कार्यक्रमात मात्र नागरिकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. या कार्यक्रमात अनेकांनी मास्कही परिधान केले नव्हते. या कार्यक्रमाला शिवसेनेचे आमदार रवींद्र फाटक यांनीही उपस्थिती राखली होती. एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी राज्य शासनाकडून सार्वजनिक ठिकाणी कार्यक्रमांना बंदी घालण्यात आलेली असताना, सत्ताधारी पक्षाचे महापौर लोकांची एवढी गर्दी कशी काय जमवतात, असा प्रश्न विचारण्यात येत आहे.