Thane Marathi Language Issue | ठाण्यात मराठी-अमराठी वाद पेटला, कानाखाली आवाज, राजकारण पेटलं

ठाणे रेल्वे स्थानकाबाहेर दोन दिवसांपूर्वी एका मराठी ग्राहकाला परप्रांतीय दुकानदारानं मारहाण केली. रिचार्जच्या मुद्द्यावरुन अमराठी दुकानदाराने अमानुषपणे मारहाण केली होती. या घटनेनंतर ग्राहकाने माजी खासदार राजन बिचारेंकडे धाव घेतली. राजन बिचारेंनी त्या दुकानदाराला आपल्या कार्यालयात बोलावले. तिथे ग्राहकाने दुकानदाराच्या कानशिलात लगावली आणि आपला संताप व्यक्त केला. या घटनेनंतर दुकानदाराने आपली चूक मान्य करत, "आमची तुटी झाली आहे आणि अमला पाहिजे तर त्या व्यक्तीला जे पण आमच्यामुळे खर्च झालंय हॉस्पिटलाईत, ते आम्ही द्यायला तयार आहोत. आणि त्याने पाहिजे तर आम्हाला कानाफळी एक वाजवून द्या, मग आम्हाला आमची तुटीचं आम्हाला वाईट पडेल," असे म्हटले. या प्रकरणाचे हळूहळू राजकीय पडसाद उमटू लागले. मराठी-अमराठी वादात मनसेने उडी घेतली. मनसेचे अविनाश जाधव यांनी या मारहाणीविरोधात आक्रमक भूमिका घेतली. त्यांनी भारतीय जनता पक्षावर टीका केली. विधानसभेबाहेर आदित्य ठाकरे आणि नितेश राणेंनी यावर प्रतिक्रिया दिल्या. आदित्य ठाकरे यांनी हा वाद मराठी-अमराठी किंवा भाषेचा नसल्याचे म्हटले. "हा कुठल्याही भाषेचा वाद नाहीय. तो व्यापारी जो होता, त्यांनी कोणावर तरी दादागिरी करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी देखील हात उचलला," असे आदित्य ठाकरे म्हणाले. नितेश राणेंनी मोहम्मद अली रोड, नाल बाजार, भेंडी बाजार येथील लोकांना लक्ष्य करत, "तिथे का ना त्यांचे थोबर तोडायची हिंमत करत. तिथे का ना एका फेरीवाल्याला पकडत," असे म्हटले. त्यांनी "आमच्या कुठल्याही हिंदूला अशा पद्धतीने कोण मारत असेल, तर आमचं सरकार नक्की कारवाई करणार," असेही नमूद केले. मीरा रोड आणि ठाणे येथील गेल्या दोन दिवसांतील घटनांमुळे मराठी आणि परप्रांतीय मुद्दा पुन्हा एकदा पेटल्याचं दिसून आलं. हा स्पेशल रिपोर्ट एबीपी माझाच्या अक्षय भाटकर यांनी ठाणे येथून दिला.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola