Thane:जितेंद्र आव्हाड यांनी ओबीसींबाबत केलेल्या वक्तव्यानंतर त्यांच्या घराबाहेर भाजप कार्यकर्ते आक्रमक

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ओबीसींबाबत केलेल्या वक्तव्यानंतर आज त्यांच्या घराबाहेर भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले होते. आव्हाडांच्या घरावर मोर्चा काढण्यासाठी भाजप कार्यकर्ते अनेक ठिकाणाहून ठाण्याकडे निघाले होते. काहींना दूरवरच अडवण्यात आलं. तर आव्हाड यांच्या घरासमोर जमलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी आव्हाड यांनी निवेदन स्वीकारावं म्हणून आग्रह धरला. त्यानंतर पोलिस आणि कार्यकर्त्यांत बाचाबाची झाली आणि पोलिसांनी कार्यकर्त्यांची धरपकड  केली. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola