Thane Horror : किरकोळ वादातून अल्पवयीन प्रेयसीला जिवंत जाळले, आरोपी प्रियकर तिथेच बसून होता!
Continues below advertisement
ठाण्यातील कापूरबावडी (Kapurbawdi) परिसरात नात्याला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना घडली आहे, जिथे एका अल्पवयीन प्रियकराने आपल्याच १७ वर्षीय प्रेयसीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. 'त्याच मुलाने तिला काहीतरी केलं असावं अशी आईची तक्रार असल्याकारणाने आम्ही गुन्हा दाखल केला आहे,' अशी माहिती पोलिसांनी दिली. भाऊबीजेच्या दिवशी झालेल्या किरकोळ वादानंतर आरोपीने पीडितेला जीवे मारण्याची धमकी दिली होती. २४ ऑक्टोबर रोजी पीडिता घरात एकटी असताना आरोपीने तिच्या अंगावर डिझेल ओतून तिला पेटवून दिले. या घटनेत पीडिता ७० ते ८० टक्के भाजली असून तिच्यावर मुंबईतील KEM रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी आरोपी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन त्याची रवानगी बालसुधारगृहात केली आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement