Thane Civic Issues |न्यायमूर्तींनी शिंदेंसमोर वाचला ठाण्याच्या समस्यांचा पाढा,शिंदेंकडून तातडीने दखल

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यात एका कार्यक्रमाला उपस्थित होते. या कार्यक्रमात न्यायमूर्ती ओक यांनी उपमुख्यमंत्र्यांसमोर ठाण्यातील समस्यांचा पाढा वाचला. यामध्ये वाढती वाहतूक कोंडी, प्रदूषण, गायब होणारे तलाव आणि न परवडणाऱ्या घरांचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. न्यायमूर्ती ओक यांनी घटनेच्या एकवीस व्या कलमाचा संदर्भ देत सांगितले की, "प्रदूषणमुक्त वातावरणात राहण्याचा प्रत्येक नागरिकाला अधिकार आहे." त्यांनी ठाण्यात सेंट्रल पार्कसारख्या मोठ्या उद्यानांच्या अनुपस्थितीबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले. न्यायमूर्ती ओक यांनी मांडलेल्या या समस्यांची उपमुख्यमंत्र्यांनी तातडीने दखल घेतली. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना या समस्यांची नोंद करून घेण्याचे आदेश दिले. उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले की, ठाण्यात पंचवीस एकरमध्ये एक सेंट्रल पार्क तयार केले आहे आणि एकशे पंचेचाळीस छोटी-मोठी उद्याने विकसित केली आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola