Thane Bird Flu: शहापूर तालुक्यात बर्ड फ्लूचा शिरकाव! 23 हजार कोंबड्या प्रशासनाकडून नष्ट ABP Majha
ठाणे जिल्ह्यातील शहापूरमधील एका फार्ममध्ये 300 कोंबड्या गेल्या काही दिवसांत बर्ड फ्लूमुळे मृत्युमुखी पडल्यात. त्यामुळे जवळपासच्या परिसरातील २३ हजार कोंबड्या मारण्याची तयारी करण्यात आलीय. या फार्ममधील काही कोंबड्यांना बर्ड फ्लू झाल्यानं त्यांचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं असलं, तरी लोकांनी घाबरून जाऊ नये, असं आवाहन राज्य सरकारनं केलं आहे. पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाण्यातील शहापूर तालुक्यातील एका फार्ममध्ये सुमारे 200 कुक्कुट पक्षी होते, त्यापैकी काही पक्षांचा 2, 5 आणि 10 फेब्रुवारी रोजी मृत्यू झाला.
Tags :
Bird Flu Thane State Government Shahapur Deaths Sachindra Pratap Singh Commissioner Of Animal Husbandry Hens 23 000 Hens