Thane and CSMT Station Mega Block : ठाणे आणि सीएसएमटी स्थानकांवर महामेगाब्लॉक

Thane and CMSMT Station Mega Block : ठाणे आणि सीएसएमटी स्थानकांवर महामेगाब्लॉक

मुंबई आणि आसपासच्या शहरांमधल्या नागरिकांनी आवश्यक असेल तरच शुक्रवारपासून रविवार दुपारपर्यंत मध्य रेल्वेच्या लोकलनं प्रवास करण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. कारण मध्य रेल्वेच्या ठाणे आणि सीएसएमटी या दोन्ही स्थानकांवर पुढच्या तीन दिवसांत एकाच वेळी महामेगाब्लॉक घेण्यात येणार आहे, ठाणे स्थानकात आज मध्यरात्रीपासून पुढील ६३ तास मेगाब्लॉक घेण्यात येईल. सीएसएमटी स्थानकात शनिवार आणि रविवार मिळून ३६ तासांचा मेगाब्लॉक असेल. या दोन्ही मेगाब्लॉकमुळं शुक्रवार ते रविवार या तीन दिवसांत मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गांवर एकूण ९३० उपनगरीय लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. या तीन दिवसांत मिळून लांब पल्यांच्या ७२ ट्रेन्सही रद्द करण्यात येतील. मध्य रेल्वे मार्गावर मोजक्या लोकल ट्रेन्स कर्जत-कसाऱ्यापासून दादर आणि भायखळ्यापर्यंतच धावतील. सीएसएमटी ते भायखळा मार्गावर मध्य रेल्वेची लोकल सेवा बंद राहिल.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola