Thackeray vs Shinde : शिवसेना बाळासाहेब ठाकरे नावावर दोन्ही गटांचा दावा
Continues below advertisement
निवडणूक आयोगानं शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह गोठवलंय.. आता ठाकरे आणि शिंदे गटांना धनुष्यबाणाचं चिन्हं वापरता येणार नाही. सोबतच निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचं नावदेखील वापरण्यास मनाई केलीय. मात्र ठाकरे आणि शिंदे गटाला शिवसेनेशी संबंधित कोणतंही दुसरं नाव घेता येणार आहे.. दोन्ही गटांना नवं चिन्ह आणि पक्षाच्या नावाची निवड करण्यासाठी सोमवारपर्यंत मुदत देण्यात आलीय. दरम्यान निवडणूक आयोगाचा चिन्ह गोठवण्याचा निर्णय फक्त अंधेरीच्या पोटनिवडणुकीसाठी तात्पुरत्या स्वरुपात घेण्यात आलाय.. आगामी काळात ठाकरे गट आणि शिंदे गट काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे... या संदर्भात दोन्ही गटाच्या आज बैठका होणार आहेत.
Continues below advertisement
Tags :
Election Commission EC Maharashtra News Shivsena Maharashtra Political Crisis Thackeray Vs Shinde Maharashtra Politics Shiv Sena Symbol : Uddhav Thackeray 'Eknath Shinde . Bow And Arrow Andheri East By Poll