Thackeray vs Shinde : ठाकरे गट दुपारी 1 वाजता निवडणूक आयोगात उत्तर देणार ABP Majha
शिवसेनेतील फुटीनंतर धनुष्यबाण कुणाचा यावर निवडणूक आयोगासमोर सुरु असलेल्या लढाईत आज महत्त्वाचा दिवस आहे. शिवसेनेचा ठाकरे गट आज आपलं प्राथमिक उत्तर आयोगात दाखल करणार आहे. त्यासाठी खासदार अनिल देसाई आणि वकिलांची टीम दिल्लीत दाखल झालीय. अधेरी पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरण्याची अंतिम मुदत १४ ऑक्टोबर आहे. त्याआधी चिन्हाचं काय होणार याकडे लक्ष लागलंय.