Thackeray Unity | ठाकरे बंधूंच्या युतीवरून MNS मध्ये खदखद? इगतपुरी शिबिरातून 'या' नेत्यांना वगळले!

Continues below advertisement
मनसे प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी मराठीसाठी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले नाहीत, तर महाराष्ट्र त्यांना माफ करणार नाही, अशी परखड भूमिका मांडली होती. तसंच वैभव खेडेकर यांनीही ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची युती व्हायला हवी, अशी आग्रही मागणी केली होती. मात्र, इगतपुरीमध्ये सुरू असलेल्या मनसेच्या तीन दिवसीय शिबिराला या दोन्ही नेत्यांना बोलावण्यात आलेले नाही. ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या युतीबाबतचा त्यांचा आग्रह हेच यामागचे कारण आहे का, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. दरम्यान, जिल्हाध्यक्ष देखील या शिबिराला उपस्थित नसल्यामुळे काही पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. शिबिरासाठी पदाधिकाऱ्यांना बोलावण्याबाबत काय निष्कर्ष लावला, याबाबत पक्षात चर्चा सुरू आहे. एका पदाधिकाऱ्याने आपली भावना व्यक्त करताना म्हटले, "जिथे आपल्याला घरात सन्मान नाहीये, जग काय देणार सन्मान?" तसेच, "अशा पद्धतीने जर पक्ष मला वारंवार वाहत असेल, मग कोणच्या तोंडाने पक्षाची बाजू मांडू?" असेही त्यांनी नमूद केले. पक्षातील अंतर्गत नाराजी आणि शिबिरातील अनुपस्थिती हे महत्त्वाचे मुद्दे आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola