Raj Thackeray Ganpati| शिवतीर्थावर राजकीय नेत्यांची मांदियाळी, Eknath Shinde दाखल
राज ठाकरे यांच्या निवासस्थानी, शिवतीर्थावर, दीड दिवसाच्या गणरायाचे आगमन झाले आहे. या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय नेत्यांनी गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवतीर्थावर गणपती दर्शनासाठी पोहोचले. काल राज ठाकरे यांचे बंधू उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब तब्बल बावीस वर्षांनंतर राज ठाकरे यांच्या घरी जाऊन गणरायाचे दर्शन घेतले. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील कालच राज ठाकरे यांच्या गणरायाचे दर्शन घेण्यासाठी पोहोचले होते. दरम्यान, संजय राऊत यांनीही काल राज ठाकरे यांच्या गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. त्याचवेळी भाजपाचे नेते मोहित कांबोज हे देखील शिवतीर्थावर उपस्थित होते. या भेटींमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.