Uddhav Thackeray Affidavit: ठाकरे गटाकडून आयोगाला शपथपत्र दाखल व्हायला सुरुवात
शिवसेनेतल्या सर्वात मोठ्या फुटीनंतर ठाकरेंच्या शिवसेनेला अखेर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असं नाव मिळालं. आणि धनुष्यबाण गोठवल्यानंतर निवडणूक आयोगानं ठाकरे गटाला मशाल चिन्ह दिलं. त्यामुळे शिवसेनेच्या ठाकरे गटाला आता नवं नाव आणि नव्या चिन्हासह निवडणुकीला सामोरं जावं लागणार आहे. तीन दशकांची धनुष्यबाण निशाणी अखेर गोठवली गेली आणि ठाकरेंनी दिलेल्या तीन चिन्हांपैकी आयोगानं मशाल चिन्हावर शिक्कामोर्तब केलं. ठाकरेंनी दिलेल्या त्रिशूळ आणि उगवता सूर्य या अन्य दोन पर्यायांवर शिंदे गटानेही दावा केला होता.
Tags :
Election Commission Thackeray Shiv Sena Bow And Arrow Symbol Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray Torch Symbol Affidavit Filed