Sandeep Deshpande Attack : देशपांडे हल्ला प्रकरणी ताब्यात घेतलेला आरोप ठाकरे गटाचा पदाधिकारी
Continues below advertisement
संदीप देशपांडे प्रकरणात आज पालिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतलंय... दोन्ही आरोपींना भांडूपच्या कोकण नगर परिसरातून पोलिसांनी ताब्यात घेतलंय... या आरोपींपैकी एक आरोपी अशोक खरात हा ठाकरे गटाचा पदाधिकारी असल्याची माहिती मिळतेय.. त्यानं काही दिवसांपूर्वीच ठाकरे गटात प्रवेश केला होता.. आणि तो ठाकरे गटाच्य महाराष्ट्र माथाडी कामगार सेनेचा उपाध्यक्ष असल्याचं कळतंय... यापूर्वीही त्याच्यावर गुन्हे होते अशी माहिती आहे... या हल्ल्यात ७-८ जणांचा सहभाग असल्याचा पोलिसांना संशय आहे.. तसंच राजकीय वैमनस्यातून हा हल्ला झाल्याचा संशय असल्यानं त्या दिशेनं तपास सुरू आहे.. आज दुपारी संदीप देशपांडेही पत्रकार परिषद घेणार आहेत.. त्यात ते कुणाकडे बोट दाखवतात का... हेही पाहावं लागणार आहे.
Continues below advertisement