Sanjay Jadhav : ठाकरे गटाचे खासदार संजय जाधवांची दुसऱ्यांदा सुपारी दिल्याची माहिती
Continues below advertisement
ठाकरे गटाचे परभणीचे खासदार संजय जाधव यांची दुसऱ्यांदा सुपारी दिल्याचं समोर आलंय.. स्वत: संजय जाधव यांनी याबाबतची माहिती दिली... याबाबत स्वतः खासदार संजय जाधव यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन सुपारी देण्यामागे नेमकं कोण आहे? याचा छडा लावून पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली आहे. दरम्यान संजय जाधव यांना दोन वर्षांपूर्वी अशाच पद्धतीने नांदेडच्या रिंगा गँगकडून जीवाला धोका असल्याची तक्रार त्यांनी पोलीस अधीक्षकांकडे केली होती.. त्या प्रकरणाचा तपास सुरू असताना परत एकदा ३ कोटी रुपयांना सुपारी दिल्याची माहिती त्यांनी दिलीये..
Continues below advertisement