Thackeray Group Meeting :काँग्रेसनं आपला वापर करता कामा नये, ठाकरे गटाच्या बैठकीत भास्कर जाधव आक्रमक
abp majha web team
Updated at:
07 Feb 2024 09:36 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppThackeray Group Meeting : काँग्रेसनं आपला वापर करता कामा नये , ठाकरे गटाच्या बैठकीत भास्कर जाधव आक्रमक
बातमी ठाकरे गटातून आहे. उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या बैठकीत भास्कर जाधव यांची आक्रमक भूमिका मांडली. भाजप आणि काँग्रेसच्या संघर्षात आपला वापर होऊ द्यायचा नाही, अशी आक्रमक भूमिका भास्कर जाधव यांनी मांडली. काँग्रेसला संपवण्यासाठी याआधी भाजपनं आपला वापर केला, आता भाजपला आव्हान देण्यासाठी काँग्रेस आपला वापर करू पाहतेय, पण आपण आपल्या जागा सोडायच्या नाहीत, जास्तीत जास्त लोकसभेच्या जागा घेऊन आपण पक्ष मजबूत केला पाहिजे, असं जाधव म्हणाले. रामटेक आणि चंद्रपूरची जागा आपण लढली पाहिजे, असा आग्रह भास्कर जाधवांनी ठाकरेंकडे केला आहे.