Thackeray Brothers Unity | नाशिकमध्ये 'ठाकरे' बंधूंचा मोर्चा, राज्यात संयुक्त कार्यक्रमांचे संकेत!
नाशिकमध्ये शिवसेना आणि मनसेने संयुक्त मोर्चा काढत सत्ताधाऱ्यांना शह देण्याचा प्रयत्न केला. ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू होती. दोघांची भेट झाल्यानंतर कार्यकर्तेही एकमेकांना भेटले. त्यांच्यामध्ये एकत्र राहण्याच्या संदर्भात सुतोवाच करण्यात आले. नाशिकमध्ये आज निघालेल्या मोर्च्यामुळे युती आणखी एक पाऊल पुढे पडल्याची चर्चा आहे. एका खासदाराने सांगितले की, नाशिकचे आणि राज्यातील सर्व कार्यक्रम शिवसेना आणि मनसेचे संयुक्तपणे होतील. दोन्ही पक्षांचे मूळ आणि कुळ एकच आहे, असेही त्यांनी नमूद केले. तर एका नेत्याने ठाकरे बंधूंना शंकराचे डोळे अशी उपमा देत त्यांच्या एकीच्या आशा पल्लवीत केल्या. दोन्ही पक्षांतील नेते सातत्याने संभाव्य युतीचे संकेत देत आहेत. नाशिकने हा संदेश दिला आहे की, दोन महाराष्ट्राचे बंधू एकत्र आले, ठाकरे बंधू एकत्र आले, दोन नेते एकत्र आले आणि कार्यकर्ते एकत्र आल्यावर हा महाराष्ट्र यापुढेही फक्त ठाकरांच्याच मागे जाईल. "ज्यांच्या जीवावर तुम्ही या मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रमध्ये मोठे झालात, त्यांना तुमच्या किती पिढ्या खाली उतरल्या तरीही संपवू शकत नाहीत. कारण शंकराचे हे दोन बंधू हे शंकराचे दोन डोळे आहेत आणि हा समोर बसलेला हा शंकराचा तिसरा डोळा आहे," असे एका नेत्याने म्हटले.