Raj And Uddhav Thackeray Yuti:युतीची आशा पण सावध भाषा? युतीबाबत राज ठाकरे सकारात्मक? Special Report

Continues below advertisement
जवळपास महिनाभरापूर्वी, ५ जुलै रोजी राज आणि उद्धव ठाकरे हे ठाकरे बंधू हिंदीच्या मुद्द्यावर एकत्र आले होते. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राज ठाकरे यांनी मातोश्रीवर जाऊन शुभेच्छा दिल्या. या भेटीगाठींमुळे दोन्ही ठाकरेंच्या युतीबाबत चर्चा सुरू झाल्या. उद्धव ठाकरेंनी युतीसंदर्भात सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या असल्या तरी, राज ठाकरेंनी मात्र आपले पत्ते उघड केले नाहीत. मनसेच्या नुकत्याच झालेल्या मेळाव्यात राज ठाकरेंनी एक वक्तव्य केले, ज्यामुळे युतीच्या चर्चांना पुन्हा वेग आला. "वीस वर्षांनंतर आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो तर तुम्ही का भांडताय?" असे राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना विचारले. या विधानातून त्यांनी योग्य संदेश पोहोचवला असल्याचे मनसे नेत्यांनी सांगितले. राज ठाकरेंनी मनसैनिकांच्या मनात युतीच्या आशा जिवंत ठेवल्या असल्या तरी, अधिकृत घोषणा केलेली नाही. योग्य वेळी निर्णय घेतला जाईल असे त्यांनी म्हटले. ठाकरेंच्या शिवसेनेने यावर बोलताना, युतीची प्रक्रिया सुरू असू शकते असे संकेत दिले. शिंदेंच्या शिवसेनेने राज ठाकरेंना पूर्वी मिळालेल्या वागणुकीची आठवण करून दिली. भाजपने मात्र आपली महायुती निश्चित असल्याचे आणि ५१ टक्के लढाई जिंकणार असल्याचे म्हटले. मराठी विजय मेळावा आणि वाढदिवसानिमित्त एकत्र आलेले ठाकरे बंधू आता युतीची सप्तपदी पूर्ण करतात का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola