Thackeray brothers unity | ठाकरे बंधू एकत्र, पण युतीचा संभ्रम कायम!

Continues below advertisement
५ जुलै रोजी राज आणि उद्धव ठाकरे एकाच मंचावर आल्याने कार्यकर्ते आणि जनतेच्या आशा वाढल्या. मात्र, ठाकरे बंधूंचे पक्ष एकत्र येणार आहेत की नाही, हा प्रश्न सध्या अनुत्तरित आहे. यामुळे MNS चे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. राज ठाकरे यांनी प्रवक्ते आणि नेत्यांना जाहीर न बोलण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, MNS च्या नेत्यांनी युतीच्या संदर्भात खुलेपणाने बोलणे टाळले आहे. बाळा नांदगावकर यांच्या "आधी एकटे लढलो यापुढे सुद्धा वेळ आली तर एकटे लढण्याची तयारी करु" या प्रतिक्रियेमुळे MNS आणि सेना यांच्या युतीबाबतचा संभ्रम अधिक वाढला आहे. दुसरीकडे, ठाकरेंच्या शिवसेनेकडून युतीसाठी तयारी दर्शवली जात आहे आणि ही युती लवकरात लवकर व्हावी, अशा प्रतिक्रिया नेत्यांकडून येत आहेत. यामुळे युतीचे नेमके काय होणार, अशी चर्चा सुरू झाली आहे. संदीप देशपांडे यांनी युतीबाबत प्रश्न विचारला असता बोलणे टाळले आणि माध्यमांना प्रतिक्रिया न देता ते निघून गेले. मराठीच्या मुद्द्यावर ठाकरे बंधू एकत्र येतात. प्रत्येक पक्ष स्वतःचा विस्तार कसा होईल, यावर लक्ष देत असतो.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola