Hindi Issue | ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने महाराष्ट्रातील राजकारण तापले
हिंदीच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी संयुक्त मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. 5 तारखेला होणाऱ्या या मोर्चाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा सुरू असताना हा मोर्चा महत्त्वाचा मानला जात आहे. या मोर्चानंतर दोघेही एकत्र राहतील का याबद्दल चर्चा सुरू आहे. अनिल परब आणि बाळा नांदगावकर यांनी या संदर्भात म्हटले की, "तो निर्णय राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेच घेतील."