Thackeray brothers unite | Uddhav आणि Raj Thackeray एकत्र, Marathi भाषेचा विजय!

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष साहेब ठाकरे एका मंचावर उपस्थित झाले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात झाली. गेल्या काही वर्षांपासून अनेक जणांच्या मनात असलेला 'दोन भाऊ एकत्र येतील का?' हा प्रश्न आज प्रत्यक्षात आला. मराठी भाषेवर अन्याय करण्याचा प्रयत्न झाला आणि मागच्या दाराने तिसरी भाषा घुसवून माय मराठी संपवण्याचे डावपेच सुरू झाले, हे या एकजुटीचे निमित्त ठरले. मराठी अभिजात भाषा होती, आहे आणि असेल, या भूमिकेवर दोन्ही नेते ठाम होते. हे डावपेच उधळून लावण्यासाठी ठाकरे बंधूंसह इतर सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, साहित्यिक, कलावंत, पत्रकार, शेतकरी, कामगार आणि समस्त मराठी माणूस आपले मतभेद विसरून एकत्र आले. सर्वांची भावना एक झाली. "महाराष्ट्रावर केली सक्ती तर आम्ही दाखवून दाखवून आमची शक्ती," या एकजुटीच्या भावनेतून मराठी जनांनी आपली शक्ती दाखवली. ही शक्ती दिसताच समस्त मराठी जनांना अन्यायकारक वाटणारा तो शासन निर्णय मागे घेण्यात आला. या एकजुटीमुळे मराठी भाषेवरील अन्याय दूर झाला.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola