Eknath Shinde on Uddhav Thackeray : पेपरी त्यांचा...चाकरही त्यांचा; शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला

महाराष्ट्राला ठाकरे बंधूंची युती होणार का हा प्रश्न पडला आहे. उद्धव ठाकरेंच्या महामुलाखतीत या प्रश्नांची उत्तरे मिळतील अशी आशा होती, मात्र ती मावळली. उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना कधीही फोन करू शकतो आणि आताही भेटू शकतो असे वक्तव्य केले. दोघे एकत्र आल्याने कुणाला काही प्रॉब्लेम असेल तर त्यांनी पोटदुखी सांभाळावी असेही उद्धव ठाकरे यांनी मुलाखतीत म्हटले आहे. "मी आत्ता फोन उचलून त्याला फोन करू शकतो. तो मला करू शकतो. आम्ही आत्ता भेटू शकतो का? अडचण काय आहे? बाकीचे लोकं एकमेकाला चोरून मारून भेटतात. आम्ही चोरून मारून भेटणारे तकले नाहीयेत. भेटायचं असतं उघडं भेटू. काय अडचण काय आहे कोणाला?" असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. उद्धव ठाकरेंच्या या मुलाखतीवरुन एकनाथ शिंदेंनी निशाणा साधला. "पेपरही त्यांचा, चाकरही त्यांचा. त्याच्या मुलाखतीवर काय बोलायचंय मला जाऊ दे ना तुम्ही काय एक्सेप्ट केलंय हे माहित नसून गोष्ट आहे आणि आतापर्यंत जे जातंय ते म्हणजे कचरा तो कचऱ्याच्या डब्यात टाकतायत," असे शिंदेंनी म्हटले. एखादा कार्यकर्ता पक्ष सोडून जातो त्यावेळेस त्याने आत्मचिंतन आणि आत्मपरीक्षण करायचे असते असेही शिंदेंनी नमूद केले.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola