Raj Thackeray on BMC Elections : मुंबईत फक्त ठाकरे गट-मनसेची ताकद, राज ठाकरे यांचं मोठं वक्तव्य
Continues below advertisement
राज ठाकरे यांच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा सुरू झाली आहे. पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात बोलताना राज ठाकरे यांनी म्हटले की, मुंबईत फक्त मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचीच ताकद आहे, बाकीच्या पक्षांची नाही. त्यांच्या या वक्तव्यामुळे ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाची शक्यता वर्तवली जात आहे. राज ठाकरे यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना आपली ताकद ओळखून निवडणुकीच्या कामाला लागण्याचे आवाहन केले. तसेच, मतदार याद्या तपासण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. दुसरीकडे, या वक्तव्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मुंबईतील पक्षांच्या ताकदीवरून पलटवार केला. २०१४, २०१९ आणि २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत मुंबईत भाजप हाच सर्वात मोठा पक्ष होता, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. या वक्तव्यांमुळे मुंबईच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फुटले आहे.
Continues below advertisement