Shiv Sena MNS Alliance | Thackeray बंधूंच्या भेटी वाढल्या, Nashik मध्ये संयुक्त मोर्चा
ठाकरे बंधूंच्या गाठीभेटी वाढल्या आहेत. या भेटींनंतर आता युतीची चाहूल लागली आहे. याचे बिगुल आज नाशिकमधून वाजण्याचे चिन्ह आहेत. नाशिक शहरात आज ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांचा संयुक्त मोर्चा निघणार आहे. या मोर्चासाठी दोन्ही पक्षांचे बडे नेते थेट मुंबईहून नाशिकला पोहोचणार आहेत. नाशिक शहरातील गुन्हेगारी, MD drugs, जुगार, शेतकऱ्यांना हमीभाव आणि शेतकरी कर्जमाफी या प्रश्नांवर हा मोर्चा निघणार आहे. शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा वगळता उर्वरित मुद्दे स्थानिक स्वरूपाचे आहेत. तरीही या स्थानिक मुद्द्यांसाठी MNS आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे बडे नेते रस्त्यावर एकत्र येऊन शक्तिप्रदर्शन करणार आहेत. यामध्ये खासदार Sanjay Raut, MNS चे बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे, अविनाश अभ्यंकर हे नेते सहभागी होणार आहेत. हे शक्तिप्रदर्शन म्हणजे अघोषित युतीच असल्याचं मानलं जातंय.