Special Report Thackeray Brothers Alliance: उद्धव ठाकरेंचं मोठं विधान, 'आम्ही दोघे समर्थ'

Continues below advertisement
मनसे अध्यक्ष राज ठाकरे इंडिया आघाडीत सामील होणार का, हा प्रश्न सध्या चर्चेत आहे. याला कारण ठरलं उद्धव ठाकरेंनी दिल्लीत केलेलं एक वक्तव्य. राज ठाकरेंसोबत युतीचा निर्णय घेण्यासाठी दोघे समर्थ आहोत, असे उद्धव ठाकरे म्हणाले. इंडिया आघाडीच्या बैठकीत यावर चर्चेची गरज नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. या वक्तव्याचे अनेक अर्थ काढले जात आहेत. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर इंडिया आघाडीला कोणताही आक्षेप नसेल, असा एक अर्थ काढण्यात येत आहे. तर, काँग्रेसला न विचारता उद्धव ठाकरेंना काही करता येणार नाही, असा टोला शिंदे गटाच्या मंत्र्यांनी लगावला. ठाकरे बंधू एकत्र आल्यास मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीवर परिणाम होईल, असा अंदाज व्यक्त होत आहे. मात्र, राज ठाकरे यांचा इंडिया आघाडीत समावेश होणे कठीण आहे, कारण काँग्रेस याला कधीच मान्यता देणार नाही, असे मत काही विश्लेषकांनी व्यक्त केले आहे. बिगर-मराठी भाषिकांवरील हल्ल्यांचा मुद्दा काँग्रेससाठी अडचणीचा ठरू शकतो. यामुळे बिहार विधानसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला फटका बसण्याची शक्यता आहे. इंडिया आघाडी विचारपूर्वक निर्णय घेईल, असे संकेत उद्धव ठाकरेंनी दिले आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola