Thackeray brothers alliance | ठाकरे बंधूंच्या युतीची जोरदार चर्चा, मुंबईचा महापौर कोण?

Continues below advertisement
ठाकरे बंधूंनी युतीच्या दृष्टीनं मोठं पाऊल टाकलं आहे. संजय राऊत यांच्या दाव्यानुसार, उद्धवजी आणि राज ठाकरेंमध्ये पाच महानगरपालिकांमध्ये एकत्र लढण्याबाबत एकमत झाले आहे. यामध्ये मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली, पुणे आणि नाशिक या महत्त्वाच्या महानगरपालिकांचा समावेश आहे. दोन्ही ठाकरे बंधूंनी गेल्या तीन महिन्यात पाचवेळा भेट घेतली आहे, ज्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेना आणि मनसेची युती होणार का, हे पाहणे महत्त्वाचे आहे. संजय राऊत यांनी मुंबईत ठाकरे बंधूंचाच महापौर होणार असल्याचा दावा केला आहे. यावर बाळा नांदगावकरांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिली. "दिल्लीचे जोडे उचलणारा कोणीही माणूस मुंबईचा महापौर होणार नाही. कोणी तरी आमचाच महापौर होईल. आमचा म्हणजे आमचा मी हम या शब्दाने बोलतोय। म्हणजे ठाकरे बंधूंचा? हो, ठाकरे बंधूंचाच होणार महापौर ना?" असे बाळा नांदगावकर म्हणाले. ही युती 'दिल ऑवर दिमाग से बनी हुई युती' असल्याचेही म्हटले जात आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola