Thackeray- Ambedkar : ठाकरे- आंबेडकर युतीच्या चर्चा 'ट्रॅक'वर येणार?
शिवसेनेतील बंडखोरीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात आता नव्या राजकीय समीकरणांची मांडणी होताना दिसतेय. बंडखोरीनंतर शिवसेनेने संभाजी ब्रिगेडसोबत राजकीय सलगी केली होती. यानंतर आता राज्यात पुन्हा एकदा शिवशक्ती आणि भिमशक्तीच्या राजकीय प्रयोगाची शक्यता वर्तवली जातेय. उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्या युतीच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. २० नोव्हेंबरला उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्या भेटीची शक्यता असून या भेटीत काय चर्चा होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.
Tags :
Politics Maharashtra Insurgency Maharashtra Arrangement Of Political Equations Sambhaji Brigade Political Succession Shivshakti Bhimshakti Possibility Of Political Experiment Political Circle