Sanjay Raut Announcement : मुंबईसह अनेक महापालिका लढणार, संजय राऊतांची मोठी घोषणा
ठाकरे बंधू कधी एकत्र येणार या चर्चेदरम्यान, ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एक मोठी घोषणा केली आहे. मुंबईसह ठाणे, कल्याण डोंबिवली आणि नाशिक या महानगरपालिकांमध्ये ठाकरेंची Shiv Sena आणि MNS एकत्र लढणार असल्याचे राऊत यांनी सांगितले. महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या एकजुटीसाठी ठाकरे बंधूंनी तलवार उपसल्याचे राऊत म्हणाले. मुंबई महानगरपालिका ठाकरे बंधू एकत्र येऊन जिंकणार आहेत. "आता कोणतीही शक्ती आली अघोरी शक्ती आली तरी ही वज्रमुठ मराठी माणसाची तोडू शकत नाही," असे राऊत यांनी म्हटले. या घोषणेनंतर भाजपच्या नेत्यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. दोन भावांची चर्चा झाली का, पक्ष एकत्र येण्याचे ठरले आहे का, की संजय राऊत हवेत गोळीबार करत आहेत, असे प्रश्न भाजप नेत्यांनी उपस्थित केले. वीस वर्षे राज ठाकरे आणि MNS आठवली नाही, आता त्यांना ती आठवायला लागली, असेही भाजप नेत्यांनी म्हटले. लोकांचा विश्वास महायुतीवरच असल्याचे भाजप नेत्यांनी सांगितले. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने मांसाहार बंदीची घोषणा केली होती आणि याला विरोध झाला होता.