Thackeray Alliance: 'राज-उद्धव एकत्र येणार', BMC निवडणुकीसाठी शिवसेना-मनसेच्या जागावाटपाची बोलणी सुरू?

Continues below advertisement
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यात वाढलेल्या कौटुंबिक जिव्हाळ्यामुळे आता राजकीय वर्तुळातही त्यांच्या पक्षांमध्ये जवळीकीचे चित्र दिसत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 'ठाकरेंची शिवसेना आणि मनसे या दोन्ही पक्षांच्या नेत्यांच्या संयुक्त बैठका झाल्यात.' या बैठकांमध्ये मुंबई महानगरपालिका (BMC Elections) निवडणुकीसाठी रणनीती आखली जात असल्याची माहिती आहे. दोन्ही पक्षांनी अद्याप युतीची (Alliance) अधिकृत घोषणा केली नसली तरी, पडद्यामागे हालचालींना वेग आला आहे. दोन्ही पक्षांची प्रत्येक वॉर्डमधील ताकद आणि प्रभाव लक्षात घेऊन जागा वाटपाचा (Seat Sharing) विचार करण्यात येत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. या संभाव्य युतीमुळे मुंबईच्या राजकारणात मोठी समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अनेक महिन्यांपासून दोन्ही नेत्यांमध्ये बैठका सुरू असून, मराठी मतांचे विभाजन टाळण्याचा दोन्ही पक्षांचा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola