TET Exam Scam Case :TET पेपरफुटी प्रकरणी पुणे पोलिसांची आणखी दोेघांना केली अटक,सुखदेव डेरे यांना अटक

टीईटी पेपरफुटी प्रकरणी पुणे पोलिसांची आणखी दोेघांना अटक करण्यात आलीय. महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचे माजी विभागीय अध्यक्ष सुखदेव डेरे यांना अटक करण्यात आलीय. संगमनेरमधल्या मूळ गावातून त्यांना अटक करण्यात आलीय. तर याच प्रकरणात बंगळुरूमधून जीए टेक्नॉलॉजीचे प्रमुख अश्विनकुमार यांनाही अटक करण्यात आलीय. शिक्षक पात्रता परीक्षेत गैरमार्गाचा अवलंब केल्याप्रकरणी पुणे पोलिसांच्या सायबर विभागानं ही कारवाई केलीय. या प्रकरणात आतापर्यंत ५ आरोपींना अटक करण्यात आलीय. तपासात या प्रकरणाचे धागेदोरे कुणापर्यंत पोहचणार याबाबत उत्सुकता आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola