CM Speech Highlights : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील महत्त्वाचे दहा मुद्दे!

Continues below advertisement

मुंबई : महाराष्ट्राची जनता संयम पाळत आहे.  रु्ग्णसंख्या ओसरली नाही पण रुग्णवाढ स्थिरावली आहे. जर निर्बंध लावले नसते तर महाराष्ट्रात साडेनऊ ते दहा लाख रुग्ण असते, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. अजूनही काही दिवस निर्बंध पाळणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. 

मुख्यमंत्री म्हणाले, गेल्या वर्षीपासून महाराष्ट्रावर दुष्टचक्र आहे. गेले काही दिवस लॉकडाऊनसदृश्य बंधने टाकली आहे. सध्या गरज असली तरी तरी लॉकडाऊन करण्याची गरज वाटत नाही. कारण सगळे वागताना समजुतदारपणा दाखवत आहेत. त्यामुळे 9 ते 10 लाख अॅक्टिव्ह रुग्णांची शक्यता आपण 6 लाखांपर्यंत मर्यादेत ठेवली आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram