ST संपाच्या काळात खासगी बसेसला प्रवासी वाहतुकीची तात्पुरती परवानगी, स्कूल बस, मालवाहू वाहनांनाही परवानगी
Continues below advertisement
एसटी संपाच्या काळात खासगी बसेस, स्कूल बसेस आणि कंपनीच्या मालकीच्या बसेसना प्रवासी वाहतुकीची परवानगी देण्यात आलीय. मालवाहू वाहनांनाही प्रवासी वाहतुकीची परवानगी देण्यात आलीय. ही परवानगी तात्पुरत्या स्वरुपाची आहे. आज मध्यरात्रीपासून हा निर्णय लागू होणार आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळं प्रवाशांचे हाल होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचं परिवहन विभागानं म्हटलंय.
Continues below advertisement