Tejashwi Yadav Voter List | बिहारमध्ये मतदार यादीतून नाव गायब, 'मी निवडणूक कशी लढणार?'
बिहारमध्ये मतदार यादीतील मोठा घोळ समोर आला आहे. विरोधी पक्षनेते Tejashwi Yadav यांचे नाव यादीतून गायब झाले आहे. या घटनेनंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. "माझं नावच नाहीया तर मी निवडणूक लढू तरी कशी?" असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. Election Commission च्या ॲप्लिकेशनमध्ये स्वतःचा EPIC नंबर टाकल्यावर 'No Record Found' असे दाखवत असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकारामुळे निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मतदार यादीतील या त्रुटीमुळे अनेक मतदारांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे.