Tejas Thackeray Dance Special Report : तेजस ठाकरेंचा डान्स;विरोधकांना टीकेचा चान्स!

Continues below advertisement

Tejas Thackeray Dance Special Report : तेजस ठाकरेंचा डान्स;विरोधकांना टीकेचा चान्स!  प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचे  चिरंजीव अनंत अंबानी यांच्यासोबत  स्टेजवर ठेका धरलेली व्यक्ती तुम्हाला  कदाचित ओळखू येणार नाही... म्हणून आम्ही  तुम्हाला ते अधोरेखित करून दाखवत   आहोत... तुम्ही कदाचित त्यांना ओळखू  शकणार नाही, असं आम्ही म्हणतोय कारण  ते प्रसिद्धी आणि कॅमेऱ्यापासून सहसा लांब   राहतात... तेजस ठाकरे त्यांचं नाव...  संपूर्ण नाव तेजस उद्धव ठाकरे... माजी  मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव  ठाकरे यांचे ते कनिष्ठ चिरंजीव... गेल्या  काही दिवसांपासून अनंत अंबानी आणि   राधिका मर्चंटच्या विवाहानिमित्त विविध   सोहळे संपन्न होतायत... याच सोहळ्यातील   संगीत कार्यक्रमाला उद्धव ठाकरे संपूर्ण  कुटुंबासह उपस्थित होते... त्यावेळी   अनेक सेलिब्रिटींसोबत तेजस ठाकरे यांनी   खास डान्स करत ठेका धरला... आणि  उपस्थितांची मनं जिंकली... तेज ठाकरेंच्या डान्सचा हा व्हिडीओ  समोर आल्यानंतर अनेक नेत्यांनी त्यावर  तोंडसुख घेतलं... जो मराठी तरुण  "गोविंदा रे गोपाळा"   म्हणत दहीहंडीत   नाचताना कधी  दिसला नाही  ज्याचे पाय कधी  गणेशोत्सवाच्या मिरवणुकीत  थिरकले नाहीत  ज्याने गणा धाव रे... मला पाव रे... म्हणत जाखडी नृत्य केलं नाही  तो महाराष्ट्राचा उमदा तरुण चेहरा अंबानींंच्या  लग्नात शेवटच्या रांगेत  नाचताना दिसला...!  आणि मराठी माणसाच्या काळजात धकधक झाले.   असो.. हे नृत्य कसे जगविख्यात, जीवनावश्यक...वगैरे वगैरे आहे, हे आता त्या तरुणाचे  "संजयकाका" महाराष्ट्राला पटवून देतीलच...!

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram