Special Report Tejas : नाशिकमधून 'तेजस'चे ऐतिहासिक उड्डाण, हवाई दलाची ताकद वाढली
Continues below advertisement
स्वदेशी बनावटीच्या तेजस (Tejas) लढाऊ विमानाने नाशिकच्या (Nashik) HAL कॅम्पसमधून पहिले यशस्वी उड्डाण केले, यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) उपस्थित होते. 'नाशिकची भूमी केवळ आस्था आणि श्रद्धेचेच नाही, तर आत्मनिर्भरता आणि क्षमतेचेही प्रतीक बनली आहे,' असे गौरवोद्गार राजनाथ सिंह यांनी काढले. नाशिकमधील हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या (HAL) कारखान्यात वर्षाला आठ तेजस विमानांची निर्मिती होणार असून, बंगळूरनंतर ही तिसरी उत्पादन लाईन आहे. हे विमान ५०,००० फूट उंचीवर उड्डाण करू शकते आणि एकावेळी तीन हजार किलोमीटरपर्यंत मारा करू शकते. संरक्षण मंत्र्यांनी 'ऑपरेशन सिंदूर'मधील नाशिक टीमच्या योगदानाचा उल्लेख करत भारतीय हवाई दलाची सज्जता कोणत्याही परिस्थितीत कमी होऊ देणार नाही, असे सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २५ नोव्हेंबर २०२३ रोजी बंगळूरूमध्ये तेजस विमानातून उड्डाण केले होते.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement